Surprise Me!

चीनची नव्या वादाला 'फोडाणी' । पुन्हा ड्रॅगन ओकला | Dalai Lama's Latest News 2017

2021-09-13 0 Dailymotion

तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेणे हा खूप गंभीर गुन्हा आहे. एखाद्या देशाने त्यांचे आदरातिथ्य केले किंवा त्यांच्या एखाद्या बड्या नेत्या दलाई लामा यांची भेट घेतली, तर तो खूप मोठा गुन्हा आहे, असे चीनने म्हटले आहे. चीनने हा इशारा जगभरातील नेत्यांना दिला आहे. मुळात दलाई लामा यांना भारताने आश्रय दिला असून, ते धरमशाला येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे चीनचा हा इशारा अप्रत्यक्षपणे भारताला असल्याचे मानले जातात. <br /><br />दलाई लामा यांनी चीनच्या तिबेटमधील हस्तक्षेपाला विरोध दर्शवत १९५९मध्ये तिबेट सोडला. तिबेट हा चीनचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातील नेत्यांनी दलाई लामांची भेट घेण्याला चीनने सातत्याने विरोध केला आहे. आता दलाई लामा यांना भेटणे हा मोठा गुन्हा असल्याचे सांगून चीनने नव्या वादाला फोडणी दिली आहे. याबाबत चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटचे कार्यकारी मंत्री झांग यिजोंग म्हणाले, 'एखाद्या देशाचा नेता, एखादी संस्था दलाई लाम यांची भेट घेत असेल, तर चीनच्या नागरिकांसाठी ते खूप गंभीर गुन्हा आहे. चौदावे दलाई लामा हे धर्माच्या नावाखाली राहणारे एक राजकीय व्यक्तिमत्व आहे, हे मला स्पष्ट करायचे आहे.' यिजोंग यांनी लामा यांच्याविषयी टीका करताना भारताचे किंवा इतर कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon